शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे..; गौहर खानने बॉलिवूड कलाकारांवर साधला निशाणा

शेतकरी आंदोलनाचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असून, त्यावर आचा ट्विटर युद्ध सुरु झाले आहे

नवी दिल्ली । केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या 2 महिन्यांपासून दिल्लीत विविध सीमांवर आंदोलन सुरुच आहे. आत या आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय पडसाद सुद्धा उमटायला लागले आहे. आंतरराष्ट्रीय कलाकारांनी शेतकरी आंदोलनावर आपली भूमिकास स्पष्ट केल्यानंतर आता, भारतीय कलाकार देखील ट्विटरच्या माध्यमातून आंदोलनावर प्रतिक्रिया देत आहे. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानासह अनेक विदेशी कलाकारांनी शेतकरी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्याला अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी, लता मंगेशकर, करण जोहर आणि माजी क्रिकेतर सचिन तेंडूलकर यांनी प्रत्युत्तर दिले.

शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत विषय असून, आम्ही तो योग्य पद्धतीने सोडण्याचा प्रयत्न करत आहोत. असे भारतीय कलाकारांनी म्हटलं आहे. कलाकारांची ही भुमिका शेतकरी विरोधी असून, या कलाकारांवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाण संताप व्यक्त केला जात आहे. याच मुद्यावर आता गौहर खान हिने उडी मारली आहे. गौहर हिने ट्विट करत सांगितलं आहे की, '#BlackLivesMatter हा भारतीय मुद्दा नसून, भारतीय कलाकार त्याच्या समर्थनार्थ ट्विट करत आहे. प्रत्येकाचे आयुष्य महत्वाचे आहे. पण भारतीय शेतकरी? त्यांच्या आयुष्याला काही महत्व नाही का?' असा सवाल गौहरने उपस्थित केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies