फेविक्विकच्या अॅडमध्ये स्वॅग दाखवणाऱ्या 'या' आजींचे निधन

अजय देवगनच्या ‘रेड’ चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री पुष्पा जोशी यांचे मंगळवारी निधन झाले

नवी दिल्ली ।  अजय देवगनच्या ‘रेड’ चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री पुष्पा जोशी यांचे मंगळवारी निधन झाले. रेड चित्रपटात पुष्पा यांनी अभिनेता सौरभ शुक्लाच्या आईची भूमिका केली होती. या चित्रपटातील त्यांच्या कामाबद्दलही त्यांचे खूप कौतुक झाले.

त्या 85 वर्षांच्या होत्या आणि नुकत्याच फविकिकच्या एडमध्ये झळकल्या होत्या. येथूनच त्यांना स्वॅगची आजी म्हणून ओळखले जाऊ लागले. गेल्या आठवड्यात पुष्पा जोशी घरात घसरल्याचं सांगण्यात येत आहे, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना फ्रॅक्चर झाले होते.

रेड चित्रपटाचे दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. त्यांनी पुष्पा जोशींसह एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, 'पुष्पा जोशी यांच्या मृत्यूच्या बातमीने मला अतिशय वाईट वाटते. माझ्या दिग्दर्शनाच्या कारकीर्दीत तुम्हाला अभिनय करणे पाहणे फार महत्वाचे होते. आपण सेटवर आणि त्याही पलीकडे आनंदी आणि चैतन्यशील होता. आम्हला तुमची खूप आठवण येईल.

याशिवाय कास्टिंग डायरेक्टर शिखा प्रदीपनेही पुष्पा जोशी यांच्या निशानवर शोक व्यक्त केला आहे. त्याने पुष्पासाठी फेसबुकवर पोस्ट केले. रेड चित्रपटामध्ये काजोलला अम्माची भूमिका साकारणाऱ्या पुष्पा जोशी यांचे काम देखील आवडले होते. त्यांनी पुष्पाचा व्हिडिओही शेअर केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies