सुशांतने आईच्या नावाने लिहली होती शेवटची पोस्ट, जाणून घ्या...

अभिनेता सुशांत सिंह अनेक दिवस सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव होता.

मुंबई  | बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेता सुशांत सिंह राजपूतने अगदी काही वेळापुर्वीच आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एम एस धोनी या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या या अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने संपुर्ण बॉलिवूड क्षेत्रात शोककळा पसरली आहे. दरम्यान सुशांतने गळफास का केला याची माहिती अद्यापही अस्पष्ट आहे. रविवारी दुपारी त्याचा मृतदेह घरात पंख्याला लटकलेला आढळून आल्यानंतर त्याच्या नोकराने फोन करून पोलिसांना ही माहिती दिली. अभिनेता सुशांत सिंह अनेक दिवस सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव होता. त्याची शेवटची पोस्ट त्याच्या आईच्या नावावर आहे. यात त्याने लिहले आहे. की 'आंसुओं से वाष्पित होता अतीत, मुस्कुराहट के एक आर्क को उकेरते सपने और एक क्षणभंगुर जीवन, दोनों के बीच बातचीत'. सुशांत जेव्हा 16 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आईने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर सुशांत नेहमी सोशल मीडियावर अनेकदा आई विषयी प्रेम व्यक्त करत होता.

सुशांत वांद्रेच्या घरात एकटाच राहत होता. त्याच्या आत्महत्येबद्दल पोलिस शेजाऱ्यांकडून बयान घेत आहेत. सुशांत सहा महिन्यांपासून नैराश्यात होता, अशी माहितीही आहे. पण आत्महत्येसारखे पाऊल उचलेल हे कोणालाही ठाऊक नव्हते. चित्रपट कारकीर्दीबद्दल सांगायचे तर चित्रपटांपूर्वी त्याने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुशांतची 'किस देश में है मेरा दिल' ही होती. मात्र त्याला पवित्र रिश्ता सीरियलमधून जास्त पसंती मिळाली. त्यानंतर त्याने काई पो चे, एमएस धोनी, केदारनाथ, छिचोरे यासारख्या हिट चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली होती. AM News Developed by Kalavati Technologies