सुशांतसिंग राजपुत आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, अभिनेत्री रिया चक्रवतीविरोधात गुन्हा दाखल

सुशांतसिंग राजपुतच्या वडिलांच्या तक्रारीवरुन अभिनेत्री रिया चक्रवतीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

नवी दिल्ली | बॉलिवुड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला एक नवीन वळण लागले आहे. बिहारमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिया चक्रवर्ती ही सुशांतची जवळची मैत्रीण होती. मात्र, रियाने सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं, असा आरोप सुशांतचे वडील के के सिंग यांनी केला होता. त्यावरुन आता रिया चक्रवर्ती विरूद्ध एफआयआर दाखल करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाने सुशांतकडून पैसे घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सुशांतच्या वडीलांनी केला आहे. त्यामुळे पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 341, 342, 380, 406, 420, 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात सुशांतचे वडील केके सिंग यांनी आपल्या अर्जात लिहिले आहे की मुंबई पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासावर त्यांचा विश्वास नाही. त्यामुळे सदरील प्रकरणाची संपुर्ण चौकशी पाटणा पोलिसांनी करावी. तसेच के के सिंग यांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले आहेत. केके सिंगच्या म्हणण्यानुसार रियाने सुशांतची फसवणूक केली, त्याचे पैसे हडपले. तसंच सुशांतला रियाच्या कुटुंबातून पूर्णपणे गंडवण्यात आलं आहे.

रिया चक्रवर्तीचा जबाब काय?

पहिली भेट

“माझी आणि सुशांतची 2013 मध्ये ओळख झाली. त्यावेळी सुशांत ‘शुद्ध देसी रोमान्स’ नावाचा चित्रपट करत होता, तर मी ‘मेरे डॅडी की मारुती’ हा सिनेमा करत होते. या दोन्ही चित्रपटाचे सेट जवळ-जवळ होते. त्याच ठिकाणी आम्ही पहिल्यांदा भेटलो.” असं रिया चक्रवर्ती हिने सांगितलं.

तेव्हा सुशांत आधीच रिलेशनशिपमध्ये

“वेगवेगळ्या पार्टीमध्ये आमची भेट होत असे. एका पार्टीत आमची मैत्री झाली. आम्ही एकमेकांचे नंबर घेतले. त्यानंतर आम्ही एकमेकांना अधून मधून भेटत होतो. पण त्या काळात सुशांत आधीच रिलेशनशिपमध्ये होता.” अशी माहितीही रियाने दिली.

रिलेशनशिपला सुरुवात

“आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. नंतर 2017-2018 च्या दरम्यान आम्ही एक प्रॉडक्शन हाऊस सोडलं आणि वेगवेगळे काम करु लागलो. त्यानंतर आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो.” असं रिया चक्रवर्ती हिने सांगितलं.

सुशांतच्या मनात सतत विचार

“सुशांतच्या मनात सतत काही ना काही विचार चालत असायचा. पण त्या गोष्टी तो कधी कोणाला सांगायचा नाही. त्याला काही टेंशन आल्यास तो एकांतवासात जायचा किंवा पुणे येथील पवनामधील त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन राहायचा. त्याला सतत डिप्रेशन येत होतं. त्यामुळे तो डॉक्टरकडे गेला आणि त्यानंतर त्याला औषध घ्यावं लागलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याने औषध घेणं बंद केलं होतं.” असा दावा रिया चक्रवर्ती हिने केला.

6 जूनपासून मी सुशांतसोबत त्याच्या घरी

“6 जूनपासून मी त्याच्यासोबत त्याच्या घरी होते. काही दिवस राहिले. त्यावेळी पुन्हा तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याने मला तू तुझ्या घरी जा, मी एकट्याला राहायचं आहे, असं सांगितलं. यानंतर मी त्याला सोडून माझ्या घरी निघून आले. त्याला एकांतवास हवा असेल म्हणून मी निघून आले. मात्र 14 जून रोजी त्याच्या आत्महत्येचं वृत्त समजताच मला धक्का बसला. तो या टोकाला जाईल असं वाटलं नव्हतं.” असंही रिया चक्रवर्तीने मुंबई पोलिसांना सांगितलं.



AM News Developed by Kalavati Technologies