"किसी समस्या का हल खुदकुशी नहीं है" छिछोरे चित्रपटातील सुशांत सिंह राजपूतचा डायलॉग सर्वांनाचा धक्का देणारा ठरला

अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत सुशांच जास्त काळ रिलेशनशीपमध्ये होता.

मुंबई | बॉलिवूडमधील एक उभरता सितारा म्हणून अभिनेता सुशांत सिंह राजपूतची ओळख होती. त्याच्या आत्महत्येनं बॉलिवूड हादरून गेलं आहे. छिछोरे हा सुशांतचा शेवटचा सिनेमा होता त्यात सुशांतचा एक डायलॉग आहे "किसी समस्या का हल खुदकुशी नहीं है". मात्र सुशांतच्या आत्महत्येनं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सुशांतच्या रिलेशनशिपबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपासून अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं. मात्र अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत सुशांच जास्त काळ रिलेशनशीपमध्ये होता. असंही म्हणतात सुशांतने एका टीव्ही शोमध्ये अंकिता प्रपोज केलं होतं. सहा वर्षे दोघंही रिलेशनशिपमध्ये होते.

पवित्र रिश्तामधील सुशांत आणि अंकिताची जोडी घराघरात सगळ्याच्या आवडीची होती. पवित्र रिश्तामध्ये सुशांतने मानवचा तर अंकिताने अर्चनाची भूमिका केली होती. 'झलक दिखला जा' या डान्स कार्यक्रमात सुशांतने अंकिताला प्रपोज केलं होतं. असं म्हणतात कोणत्याही सिरीअलचा शेवट सुखद असतो मात्र रिअल लाईफमध्ये सुशांत आणि अंकिता यांचं रिलेशनशिप फार काळ टीकलं नाही. आणि अचानक सुशांत आणि अंकिताच्या ब्रेकअपची बातमी आली. त्यांच्या ब्रेकअपचं कारण कधी समोर आलं नाही मात्र त्यांच्या चाहत्यांची घोर निराशा झाली. दोघंही ब्रेकअपनंतर सिनेमामध्ये बिझी झाले. या दोघांच्या नात्यांमधील एक चांगली गोष्ट चाहत्यांना आवडली ती म्हणजे ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांवर कोणतेही आरोप केले नाही.AM News Developed by Kalavati Technologies