SSR Case: एम्सच्या रिपोर्टला शेखर सुमनने नाकारलं; सुशांत प्रकरणाला 'हायजॉक' करण्याचा प्रयत्न - सुुमन शेखर

सुशांत सिंहने आत्महत्याचं केली असे एम्सने रिपोर्ट जारी केला आहे, त्या रिपोर्टला शेखर सुमनने नाकारले असून, या प्रकरणाला वेगळ्या दिशेने नेले जात आहे असे सांगितलं आहे

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणी एम्स रुग्णालयाने रिपोर्ट सादर केला आहे. त्यात सुशांतने आत्महत्याचं केली असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर या प्रकरणात आता अभिनेता शेखर सुमनने उडी मारली आहे. एम्स रुग्णालयाने सुशांत प्रकरण पुर्णत: बदलले आहे. गेल्या तीन महिन्यापांसून या प्रकरणावरून वाद-विवाद सुरू होते. पण एका रिपोर्टमुळे आता सुशांत प्रकरणाला पुर्णविराम विराम मिळाला आहे. एम्सने दिलेल्या या रिपोर्टमुळे जनतेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. असे शेखर सुमनचे म्हणणे आहे.

शेखर सुमनने एम्सच्या रिपोर्टला नाकारलं

अभिनेता शेखर सुमनने एम्सच्या रिपोर्टला नकारलं आहे. त्यांच्या मते हा प्रकरण विरुद्ध दिशेने जात आहे. सुमनने यासंबंधीत ट्विट करत सांगितलं की, 'आपण सर्वांनी सुशांतला न्याय मिळावा यासाठी एक मोठी लठाई लढली आहे. आपण सगळ्यांना न घाबरता, न थकता आपला आवाज उठवला आहे. मात्र दुर्दैवाने हा केस वेगळ्या दिशेला गेला आहे. मात्र आम्ही हार मानणार नाही. आमच्याकडे एक आशेचे किरण आहे. तो म्हणजे सीबीआय. जर सीबीआयने सुद्धा या प्रकरणात आत्महत्याच दाखवली तर, आम्ही आमच्यात ही लढाई सुरूच ठेवणार आहोत. आम्हाला सत्य माहिती आहे. आणि सत्य कधीच मरत नाही.' असे ट्विट शेखर सुमनने केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies