केबीसीमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे सोनाक्षीने दिले चुकीचे उत्तर, सोशल मीडियावर झाली ट्रोल

सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हाचे अनेक मिम्स व्हायरल होत आहे

नवी दिल्ली | बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच अमिताभ बच्चन यांच्या शो 'कौन बनेगा करोडपती 11' या शोमध्ये पोहोचली होती. या आठवड्यात शोच्या विशेष अतिथी कर्मवीर रुमा देवी यांना सपोर्ट करण्यासाठी सोनाक्षी पोहोचली होती. राजस्थानच्या बाडमेर भागातील रुमा देवी यांनी भरतकाम आणि विणकामच्या माध्यमातून हजारो महिलांच्या आयुष्यात रंग भरले आहेत. रुमा देवीच्या 'मौला' या स्वयंसेवी संस्थेला शक्य तितकी रक्कम जिंकण्यात मदत करण्यासाठी रुमा देवींच्या मदतीसाठी सोनाक्षीला स्पेशल गेस्ट म्हणून बोलावण्यात आले होते.

शोमध्ये रुमा देवीला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सोनाक्षीला रामायणाविषयी प्रश्न विचारण्यात आला. मात्र यावेळी ती अडचणीत सापडली. तिला 'रामायणानुसार हनुमान संजीवनी बूटी कोणाकडे घेऊन आले?', हा प्रश्न विचारण्यात आला. दरम्यान सोनाक्षी गोंधळून गेली आणि तिने 'सीता' असे उत्तर दिले. खरंतर या प्रश्नाचे उत्तर सोपे होते. लक्ष्मणासाठी हनुमानाने संजीवनी बूटी आणली होती. या साध्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सोनाक्षीने एक्सपर्ट अॅडव्हाइसची मदत घेतली आणि यानंतर तिने योग्य उत्तर दिले. तिला या साध्या प्रश्नाचे उत्तर न देता आल्यामुळे सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर तिच्याविषयी अनेक मिम्स व्हायरल होत आहे. काहींनी तर तिची तुलना आलिया भट्टसोबत केली आहे. कारण आलिया भट्टला जनरल नॉलेजविषयी अनेक वेळा ट्रोल जात असते. आता आलिया भटला तोडीस तोड मिळाली अशी चर्चा सोशल मीडियारव सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies