अभिनेत्री कोयना मित्रा अडचणीत, कोर्टाने सुनावली 6 महिन्यांची शिक्षा

कोयनाने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

मुंबई | अभिनेत्री कोयना मित्रा सध्या लाइमलाइटमधून गायब आहे. मात्र सध्या ती एका कारणांमुळे चर्चेत आली आहे. कोयनाला एका चेक बाउंसिंगप्रकरणी मेट्रोपॉलियन मजिस्ट्रेटच्या कोर्टाने 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. मॉडेल पूनम सेठीने तक्रार केल्यानंतर कोयनाला 1.64 लाखांच्या व्याजासह 4.64 लाख रुपये देण्याचे आदेश दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत.

2013 मध्ये पूनम सेठीने कायना मित्राविरुद्ध तक्रार दाखल केली होती. कोयनाने दिलेला चेक बाउंस झाला असा आरोप पूनमने केला होता. कोयनाने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आता ती याविरोधात वरच्या कोर्टात आव्हान देणार असल्याचे ती म्हणाली आहे. कोयना स्पष्टीकरण देत म्हणाली की, पूनम सेठी कोणाला 22 लाख रुपये उधार देऊ शकले एवढी तिची आर्थिस स्थिती चांगली नाही. तसेच कोयनाने पूनमवर चोरीचा आरोप लावला आहे.

कोयनाने पूनमला टप्प्या टप्प्यात एकूण 22 लाख रुपये दिले होते. त्यामधील तीन लाखांचा चेक बाऊन्स झाला होता. त्यानंतर पूनमने 19 जुलै 2013 रोजी कोयनाला कायदेशीर नोटीसही बजावली. मात्र तरीही कोयनाने रक्कम परत दिली नाही. यानंतर पूनमने 10 ऑक्टोबर 2013 रोजी कोयनाविरोधात कोर्टात केस दाखल केली. कोयना ही मूळ कोलकात्याची आहे. ती 40 वर्षांची आहे. 2001 मध्ये कोयना ग्लॅडरॅग्ज मेगा मॉडेल इंडिया स्पर्धेची विजेती ठरली होती. 2002 साली राम गोपाल वर्माच्या 'रोड' सिनेमातून तिने पदार्पण केले होते. त्यानंतर मुसाफिर, एक खिलाडी एक हसीना यासारख्या चित्रपटातही ती झळकली होती.AM News Developed by Kalavati Technologies