मुख्यमंत्र्याविषयी एकेरी उल्लेख कंगनाला पडला महागात; विक्रोळीत कंगनाविरूद्ध बदनामीचा गुन्हा दाखल

कंगना रणौतनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्याने शिवसैनिकांनी कंगनावर गुन्हा दाखल केला आहे

मुंबई । अभिनेत्री कंगना रणौत मुंबईच्या वक्तव्यावरून चांगलीच चर्चेत आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर, कंगना आणि शिवसेनेत ट्विटर युद्ध सुरू झालं. 9 सप्टेंबरला कंगना मुंबईत परतली आणि मुंबईत दाखल होताच तिने पुन्हा मुंबईच्या वादात उडी मारली. ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर शिवसैनिक आक्रमक झाले आहे. शिवसैनिकांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कंगनाविरूद्ध बदनामीची तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, कंगनानं आपल्या ट्विटर व्हिडीओत म्हटले होते की, "उद्धव ठाकरे तुझे क्या लगता है की, तुने फिल्ममाफिया के साथ मिलके मुझसे बहुत बडा बदला लिया है. आज मेरा घर टुटा है कल तेरा घमंड टुटेंगा. ये वक्त का पैय्या हा यार रखना, हमेशा एक जैसा नही रहता." पुढे कंगना म्हणाली की, " उद्धव ठाकरे, ये जो क्रुरता और आतंक है, अच्छा हुआ ये मेरे साथ हुआ क्यो की इसको कुछ मायने है. जय हिंद! जय महाराष्ट्र!" असा व्हिडीओ संदेश ट्विटर पोस्ट करत उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता.

काय आहे मुंबईचा प्रकरण :

अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणावरून कंगना मुंबई पोलीसांवर टिका करीत होती. " बॉलिबूडच्या माफीयांपेक्षा मला मुंबई पोलीसांची जास्त भीती वाटते. मुंबई आता पुर्वीसारखी राहिलेली नाही ती आता पाकव्याप्त काश्मीरसारखी झाली आहे" अशी टिका कंगनानं केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले होते. खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते की, "जर कंगनाला कंगनाला मुंबईत भीती वाटत असेल, तर तिने मुंबईत आपला पाय ठेऊ नये" त्यानंतर पुन्हा कंगनानं ट्विट करत सांगितले होते की, "येत्या 9 सप्टेंबरला मी मुंबईत येत आहे कोणाच्या बापाची हिंम्मत असेल तर मला हात लावून दाखवा" असे ट्विट कंगनानं केलं होतं.

कंगनाला कशी मिळाली 'Y' दर्जाची सुरक्षा :

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्याने राजकारण तापले होते. अशातच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी 'कंगना मुंबईला आली तर तिचा थोबाड फोडू' असे वक्तव्य केले होते. त्याच पार्श्वभुमीवर कंगनाला गृहमंत्री अमित शहांनी Y दर्जाची सुरक्षा प्रदान केली होती.

9 सप्टेंबर रोजी काय घडलं :

मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे कोणाच्या बापाची हिंम्मत असेल तर हात लावून दाखवा असे ट्विट कंगनानं केले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने 9 सप्टेंबरला सकाळी 11 च्या सुमारास, मुंबईतील पाली हिल्स परिसरातील तिच्या अनधिकृत कार्यालयावर पालिकेने हातोडा फिरवला. त्यानंतर कोर्टाने स्थिगीती दिल्याने तुर्ताप कंगनाच्या कार्यालयाचे तोडफोडीचे काम थांबण्यात आले. दुपारी 2.30 च्या सुमारास कंगना मुंबईला आली आणि तिने पुन्हा ट्विटर युद्ध सुरू केले.

कंगना मनपाने केलेल्या तोडफोडीनंतर आक्रमक झाली त्यानंतर तिने ट्विटरवर आपला एक व्हिडीओ पोस्ट केला त्यात तिने, "उद्धव ठाकरे तुझे क्या लगता है की, तुने फिल्ममाफिया के साथ मिलके मुझसे बहुत बडा बदला लिया है. आज मेरा घर टुटा है कल तेरा घमंड टुटेंगा. ये वक्त का पैय्या हा यार रखना, हमेशा एक जैसा नही रहता." पुढे कंगना म्हणाली की, " उद्धव ठाकरे, ये जो क्रुरता और आतंक है, अच्छा हुआ ये मेरे साथ हुआ क्यो की इसको कुछ मायने है. जय हिंद! जय महाराष्ट्र!" असे ट्विट तिने केले होते. मुख्यमंत्र्यांविषयी एकेरी शब्द वापरल्याने संतप्त शिवसैनिकांनी आज तिच्या विरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies