कनिका कपूरची दुसऱ्यांदा केलेली कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह

रविवारी कनिकाची दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली

नवी दिल्ली | गायिका कनिका कपूरची दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली होती. आता ही चाचणी देखील पॉझिटिव्ह आसी आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये हे वृत्त सांगण्यात आले आहेत. कनिकाच्या पहिल्या चाचणीच्या रिपोर्टवर तिच्या कुटुंबियांनी शंका उपस्थित केली होती. याच कारणामुळे तिची दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली होती.

कनिकाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे बोललो जात आहे. रविवारी कनिकाची दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली. यावेळी कनिकाच्या शरीरात करोना व्हायरसचा हाय डोस असल्याचे स्पष्ट झाले आहे. कनिकाची पहिल्यांदा चाचणी केल्यावर आलेल्या रिपोर्टमध्ये तिचे वय आणि लिंग चुकीची माहिती देण्यात आली होती. त्या रिपोर्टमध्ये कनिकाचे वय 28 वर्षे व लिंग महिला ऐवजी पुरुष लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे या रिपोर्टवर कुटुंबीयांकडून शंका उपस्थित करण्यात आली होती.

रुग्णालयामध्ये चांगल्या सुविधा मिळत नाही अशी तक्रार कनिकाने केली होती. मात्र आम्ही रुग्णांना सर्वोत्तम सेवा पुरवत असल्याचं रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. किंबहुना सेलिब्रिटी आहे म्हणून त्यांनी डॉक्टरांना त्रास न देण्यापेक्षा सहकार्य करावं, असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं.AM News Developed by Kalavati Technologies