मुंबई । देशात नववर्षाला कोरोना लसीसंदर्भात आनंदाची बातमी आली असून, कोरोना लसीचे ड्रायरन सुद्धा देशातील विविध ठिकाणी घेण्यात आले आहे. केंद्र सरकारने स्वदेशी कोरोना लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी दिली असून, लवकरच लसीकरणास सुरूवात होणार आहे. अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने दुबईमध्ये कोरोनाची लस घेतली असून, तिने लसीकरणानंतर आपला फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. यासोबत शिल्पाने नववर्षाचं सकारात्मकतेने स्वागत सुद्धा केलं.
फोटोमध्ये तिच्या हातावर मेडिकल टेप आणि कापूस लावलेला होता. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहले आहे की, सुरक्षित लसीकरण, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज... थँक्यू यूएई असे कॅप्शन टाकत शिल्पाने चाहत्यांसाठी फोटो शेअर केला आहे.
2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने संपुर्णपणे देश ठप्प झाला होता. कोरोनामुळे अनेक जणांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे. अशातच कोरोनाची लस कधी येणार याकडे संपुर्ण जगाचे लक्ष लागले होते. जगभरातील अनेक देशांनी कोरोना लसीचा दावा केला असून, अनेक देशात कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली आहे.
View this post on Instagram