'दबंग-3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, चाहत्यांची गर्दी

22 जुलैपर्यंत बारामतीसह फलटणमधील विविध भागात या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.

बारामती | सध्या बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा बारामतीत आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेल्या दबंग-3 चित्रपटाच्आ शूटिंगसाठी तो आला आहे. बारामती आणि फलटण तालुक्यात त्याच्या या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाविषयी प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. मात्र सलमान खान बारामतीत आला हे वृत्त कळताच चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करत आहेत. मात्र, चाहत्यांना चित्रीकरणाच्या स्थळावर प्रवेशास मज्जाव करण्यात आला.

हिंदी चित्रपटांचं शुटींग म्हटलं, की सातारा, वाई अशा भागांनाच प्राधान्य दिलं जायचं. मात्र मागील काही दिवसांमध्ये बारामतीतमध्येही चित्रपटांचे शुटींग होत आहेत. दबंग 3 या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने आता सुपरस्टार सलमान खान यासोबतच अरबाझ खान, सोनाक्षी सिन्हा, महेश मांजरेकर, दिग्दर्शक प्रभु देवा अशा दिग्गज कलाकारांनी चित्रीकरणासाठी हजेरी लावली आहे. 22 जुलैपर्यंत बारामतीसह फलटणमधील विविध भागात या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.

बारामतीत सलमान खान आल्यानंतर पहिल्यांदाच तालुक्यात बड्या अभिनेत्याच्या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं. महत्त्वाचे म्हणजे बारामती तालुक्यातील ढाकाळे येथील राहुल जगताप या युवकाची ओपन जीपही या चित्रपटात वापरण्यात आली आहे. त्याचे व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. राहुल जगताप यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी आपली ओपन जीप दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies