पुन्हा वादात अडकला सलमानचा 'दबंग 3', यामुळे भावना दुखावल्याचा आरोप

रिलीज होण्यापूर्वीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

मुंबई | सलमान खानचा 'दबंग 3' चित्रपट रिलीज होण्यास अवघे 23 दिवस बाकी आहेत. रिलीज होण्यापूर्वीच सलमानचा चित्रपट अजून एका नवीन वादात अडकला आहे. 'दबंग 3' चित्रपटावर हिंदू जनजागृती सिमितीने आक्षेप नोंदवला आहे. हिंदू जनजागृती सिमितीचा आरोप आहे की, या चित्रपटाचे टायटल साँग 'हुड दबंग दबंग'ने त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

'दबंग 3' या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी काही दिवसांपूर्वी रिलीज झाले. येत्या 20 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होत आहे. पण दरम्यान रिलीज होण्यापूर्वीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाबाबत सध्या वाद सुरू आहे. हा वाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चित्रपटातील एका गाण्यामुळे हा वाद वाढला आहे. मेकर्सनी या गाण्यातून हिंदू धर्मियांच्या भावनांना ठेच पोहोचवल्याचा आरोप केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमान खानच्य़ा दबंग सिनेमाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं कोणतही सर्टिफिकेट देऊ नये अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies