दोन केळी दिले 442 रुपयांत, पंचतारांकित हॉटेलला उत्पादन शुल्क विभागाचा दणका

दोन केळ्यांचे बिल 442 रुपये आकारणाऱ्या चंदीगढ येथील जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलला चंदीगढच्या उत्पादन शुल्क विभागाने 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.

मुंबई | अभिनेता राहुल बोस याने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्याला दोन केळी 442 रुपयांमध्ये दिल्याचे त्यांनी सांगितले होते. राहुल हा चंदीगढ येथील जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये होता. त्याला दोन केळ्यांसाठी चक्क 442 रुपये मोजावे लागले होते. त्याने व्हिडिओ पोस्ट करत केळ्यांचे बिल दाखवणारा व्हिडिओ पोस्ट केला. यानंतर हे प्रकरण सर्वांसमोर आले. आता दोन केळ्यांचे बिल 442 रुपये आकारणाऱ्या चंदीगढ येथील जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलला चंदीगढच्या उत्पादन शुल्क विभागाने 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.

राहुल बोस यांच्या चित्रपटाचे शूटिंग सध्या चंदीगढमध्ये सुरू आहे. यामुळे तो येथील जेडब्ल्यू मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला होता. वर्कआऊट करताना त्याने हॉटेलमधून नाश्त्यासाठी दोन केळी मागवल्या. मात्र या केळींचे बिल भरताना तो चक्रावून गेला. यानंतर त्याने या दोन केळींचे बील दाखवत व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यानंतर सर्व प्रकरणाची दखल पंजाब सरकारने घेतली आहे. या मॅरिएट हॉटेलला 25 हजारांचा दंड आकारण्यात आले आहे. दोन केळ्यांचे 442 रुपये घेणे या हॉटेलला चांगलेच महागात पडले आहे.

अभिनेता राहुल बोसने सांगितल्यानुसार केळीवर जीएसटी लावण्यात आला होता. फळांवर या हॉटेलने जीएसटी लावलाच कसा? असा प्रश्न यानंतर उपस्थित झाला. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त मनदीप सिंग ब्रार यांनी दिले. यानंतर चौकशी करण्यात आली. दरम्यान मॅरिएट हॉटेलला 25 हजारांचा दंड ठोठावला असेही ब्रार यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies