ऋषी कपूर यांच्यावर चंदनवाडी स्मशान भुमित केले जाणार अंत्यसंस्कार, 12-15 व्यक्तींनाच परवानगी

वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालावली.

मुंबई | दिग्गज बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले आहे. त्यांची तब्येत खराब होती त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऋषी कपूर हे कँसरने ग्रस्त होते. त्यांच्यावर अमेरिकेत उपचार करण्यात आले. गेल्या वर्षीच ते न्यूयॉर्कवरुन भारतात परतले होते. दरम्यान त्यांच्या कँसरशी लढा अयशस्वी ठरला. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालावली.

दरम्यान देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन सुरू आहे. या काळात ऋषी कपूर यांच्या अंत्यविधीत उपस्थित राहण्यासाठी केवळ 12-15 जणांना परवानगी देण्यात आली आहे. जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहे. मरिन लाईन्स येथील चंदनवाडी स्मशान भुमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. अंतिम संस्कारासाठी केवळ 12- 15 व्यक्तींनाच मुंबई पोलीसांकडून परवानगी देण्यात आली आहे. माध्यम प्रतिनीधींसह सर्वांना अंतिमसंस्काराच्यावेळी सोशल डिस्टंसिंग पाळावे लागणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies