अशी आहे ऋषी-नीतू यांची लव्हस्टोरी, काही दिवसांच्या दुराव्याने झाली होती प्रेमाची जाणीव

ऋषी कपूर यांनी नीतूसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मुंबई | दिग्गज बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले आहे. त्यांची तब्येत खराब होती त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऋषी कपूर हे कँसरने ग्रस्त होते. त्यांच्यावर अमेरिकेत उपचार करण्यात आले. गेल्या वर्षीच ते न्यूयॉर्कवरुन भारतात परतले होते. ऋषी कपूर यांच्या कठीण काळात नीतू कपूर यांच्यासोबत सावलीसारख्या उभ्या होत्या. ऋषी कपूर आणि नीतू कपूर मोस्ट आयकॉनिक ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन कपल्ममधील ए होते. लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही त्यांची केमिस्ट्री तशीच होती. ऋषी कपूर प्रत्येक गोष्टींवर नीतू कपूर यांची स्तुती करायचे. ऋषी कपूर आणि नीतूकपूर यांची लव्हस्टोरी आपण जाणून घेणार आहोत.

ऋषी कपूर यांनी नीतूसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या काळात त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवला. मात्र यावेळी ते एकमेकांकडे कधीच आकर्षित झाले नाही. मात्र एकदा बारुद चित्रपटाच्या शूटिंगसाठी ऋषी कपूर आणि नीतू कपूर हे एकमेकांपासून काही दिवस दूर गेले. तेव्हा त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली. ऋषी कपूर हे शूटिंगसाठी पॅरिसला गेले होते. तिथे त्यांना खूप एकटे वाटत होते.

2-3 दिवसात त्यांना जाणीव झाली की, त्यांचे नीतूवर प्रेम आहे. पॅरिसमधून ऋषी कपूर यांनी नीतू यांना टेलीग्राम पाठवला. टेलीग्राममध्ये ऋषी कपूर यांनी लिहिले होते की, 'ये सिखणी बड़ी याद आती है'. हे वाचून नीतू कपूर यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्या आपला आनंद लपवू शकल्या नव्हत्या. त्यांनी टेलीग्राम हा यश आणि पामेला चोपडा यांना दाखवला होता.AM News Developed by Kalavati Technologies