ऋषी कपूर यांच्या निधनाने देशावर शोककळा, दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली 

क सेलिब्रिटींसह अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

नवी दिल्ली | सलग दुसर्‍या दिवशी फिल्म इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बुधवारी इरफान खानच्या निधनानंतरचे दुःख अजून संपले नव्हते की गुरुवारी आणखी एक दिग्गजाने निरोप घेतला. गुरुवारी मुंबईतील रूग्णालयात  ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसह अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. राहुल गांधींनी लिहिले की हा आठवडा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दुःखदायक आहे. आणखी एक दिग्गज अभिनेता आपल्यातून गेला आहे.  एक प्रतिभाशाली अभिनेता जो प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्थान होता.

देशाचे माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ऋषी कपूर यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले. त्याने लिहिले की ऋषी कपूर यांचे अचानक निघून जाणे हैराण करणारे आहे. ते एक शानदार अभिनेते तसेच एक शानदार माणूस होते. त्याच्या कुटूंबियांबद्दल संवेदना.AM News Developed by Kalavati Technologies