राणू मंडल यांनी 'या' सिंगरसोबत रेकॉर्ड केलं पहिलं गाणं, कधीकाळी स्टेशनवर मागायच्या भीक

राणू मंडल कधीकाळी स्टेशन भीक मिळावी म्हणून गाणे गायच्या...

बॉलीवूड डेस्क । लता मंगेशकर यांचं गाणं 'एक प्यार का नगमा है' गाऊन रातोरात स्टार बनणाऱ्या राणू मंडल यांचे नशीब आता पालटले आहे. मेकओव्हर केल्यानंतर आता त्यांच्याकडे मोठमोठ्या ऑफर्सची लाइन लागली आहे. हिमेश रेशमिया याने आपल्या नव्या चित्रपटात राणू यांना गाणे ऑफर केले आहे. याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रसिद्ध गायक, अभिनेता हिमेश रेशमियाने आपल्या आगामी चित्रपटात राणू यांना गाण्याची संधी दिली आहे. हिमेशचा आगामी चित्रपट 'हॅप्पी हार्डी अँड हिर' येत आहे. या सिनेमात राणू मंडल यांनी 'तेरी मेरी कहाणी' नावाचे गाणे गायले आहे.
राणू यांचा रेकॉर्डिंग करतानाचा व्हिडिओही हिमेश रेशमियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. यात राणू मंडल हिमेश रेशमियासोबत स्टुडिओमध्ये गाणे रेकॉर्ड करताना दिसत आहेत.

राणू मंडल लवकरच रिअॅलिटी शो सुपरस्टार सिंगर नावाच्या शोमध्ये दिसणार आहेत. यात त्या हिमेश आणि जजेससोबत शोमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांची भेट घेतील आणि आपले गाणेही सादर करतील. हिमेश म्हणाला की, सलमानचे वडील सलीम अंकलनी मला एकदा सल्ला दिला होता की, जेव्हाही तुला टॅलेंटेड माणूस आढळून येईल, त्यांना जाऊ देऊ नको. ते मला असेही म्हणाले होते की, त्या व्यक्तीला आपल्या टॅलेंटच्या जोरावर पुढे जाण्यासाठी मदत जरूर कर.

पाहा हिमेशने शेअर केलेला व्हिडिओ...

View this post on Instagram

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) onAM News Developed by Kalavati Technologies