राजकुमार रावने नाकारली नथुराम गोडसेंची भूमिका, निगेटिव्ह रोलपासून राहतोय दूर

'गोडसे@गांधी.कॉम' या नाटकावर  आधारित हा चित्रपट आहे.

मुंबई | राजकुमार राव इंडस्ट्रीमध्ये विविध भूमिका साकाराणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या तो प्रत्येक पाऊल टाकण्यापूर्वी विचार करत आहे. कारण 'स्त्री' सिनेमानंतर रिलीज झालेल्या सहा चित्रपटांपैकी त्याच्या पाच चित्रपटांना प्रेक्षकांनी खास पसंती दिली नाही. त्याने आता राजकुमार संतोषी यांचा पुढचा चित्रपट 'गांधी वर्सेस गोडसे' मध्ये काम करण्यासही नकार दिला आहे. संतोषी यांनी राजकुमारला या चित्रपटात नथुराम गोडसेंची भूमिका ऑफर केली होती. मात्र राजकुमारला त्याच्या करिअरच्या या टप्प्यात निगेटिव्ह भूमिका साकारायची नाही.

राजकुमारने नुकतेच 'जजमेंटल है क्या' मध्ये सीरियल सायको किलरची भूमिका साकारली होती. त्याचा हा रोल चाहत्यांनी विशेष स्विकारला नाही. कदाचित याच कारणामुळे राजकुमारने निगेटिव्ह भूमिकेला नकार दिला आहे. असगर वजाहत यांचे 'गोडसे@गांधी.कॉम' या नाटकावर  आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात गांधीची भूमिका साकारण्यासाठीही अजुनही अभिनेता मिळालेला नाही. या भूमिकेसाठी नसीरुद्दीन शाह यांना अप्रोच करण्यात आले आहे. नसीर यांच्याकडून फायनल कॉल अजून आलेला नाही. मात्र ते या चित्रपटाला होकार देतील अशी शक्यता आहे.

संतोषी या चित्रपटाचा मुहूर्त शॉट गांधीजींची पूण्यतिथी 30 जानेवारीला शूट करु शकतात. यापूर्वी बापूंच्या रोलसाठी 'लगे रहो मुन्ना भाई' फेम दिलीप प्रभावलकर यांना अप्रोज करण्यात आले होते. मात्र त्यांनी चित्रपटाला नकार दिला.AM News Developed by Kalavati Technologies