'पति पत्नी और वो'ने पहिल्याच दिवशी जमवला कोट्यावधींचा गल्ला

कार्तिक आर्यनचा पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा 

मुंबई | कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे स्टारर 'पति पत्नी और वो' सिनेमाने बॉक्स ऑफिस जबरदस्त कमाई केली आहे. मुदस्सर अजीज यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 9.10 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड एनालिस्ट तरन आदर्श यांनी याविषयी ट्विट केले. ते म्हणाले की, 'दूसरा मोठा सिनेमा 'पानीपत'सोबत स्किन्स वाटून घेतल्या असूनही 'पति पत्नी और वो' सिनेमाने पहिल्याच दिवशी शानदार कमाई केली आहे. दूसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी या सिनेमाला सॉलिट ग्रोथ मिळण्याची शक्यता आहे.'

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा सिनेमा कार्तिक आर्यनचा आतापर्यंत सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. आदर्शने ट्विट करत लिहिले की, कार्तिकच्या करिअरमधील हा सर्वात जास्त ओपनर सिनेमा ठरला आहे. त्याने 'लुका छुपी' चा रेकॉर्ड मोडला आहे. याच वर्षी 1 मार्चला 'लुका छुपी' सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाने 8.01 रुपयांची कमाई केली होती.

कार्तिक आर्यनचा पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा 

रँक चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पहिल्या दिवसाची कमाई 
1 पति पत्नी और वो 6 दिसंबर 2019 9.10 कोटी रुपये 
2 लुका छुपी 1 मार्च 2019 8.01 कोटी रुपये 
3 प्यार का पंचनामा 2 16 अक्टोबर 2015 6.80 कोटी रुपये 
4 सोनू के टीटू की स्वीटी 23 फेब्रुवरी 2018 6.42 कोटी रुपये 
5 प्यार का पंचनामा 20 मई 2011 92 ला रुपये 


AM News Developed by Kalavati Technologies