अभिनेत्री कंगणा रणौतवर मुंबई मनपाने अन्याय केला - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

रामदास आठवले यांनी राज्यपालांची भेट घेतली असून, कंगणावर मनपाने केलेल्या अन्याय केला असून, तिला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे

मुंबई । मुंबई मनपाने अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर 24 तासाची नोटीस देऊन तोडक कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांनी नियमाचे उल्लंघन करून कंगणावर पालिकेने अन्याय केला आहे. त्यामुळे अभिनेत्री कंगना राणावतला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयावर तोडक कारवाई केली त्यांच्यावर कारवाई करून तिला न्याय मिळवून दिला पाहिजे. यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांना विनंती केली आहे.

कोरोनाला रोखण्यास महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. राज्य सरकारने कोरोनासाठी कठोर पावले उचलावी असे आदेश महामहीम भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला द्यावेत यासाठी निवेदन दिले आहे. कॅप्टन दीपक साठे यांचा कोझिकोड येथे विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी जीवाची पर्वा न करता अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले होते त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies