बच्चन कुटुंबियांना दिलासा! ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या कोरोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

अभिषेक बच्चन यांनी ट्विट करुन दिली माहिती

मुंबई | बॉलिवुड महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळं त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात होतं. मात्र आता उपचारादरम्यान ऐश्वर्या आणि आराध्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती अभिषेक बच्चन यांनी ट्विट वरून दिली आहे. दरम्यान  ऐश्वर्या आणि आराध्याचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्यानं अभिषेक बच्चन यांनी ट्विट करुन मेडिकल स्टाफ, आरोग्य यंत्रणेचे आभार मानले आहेत. तसेच आपल्या चाहत्यांचे सुद्धा त्यांनी आभार मानले आहेत.  

बॉलिवुड महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांना गेल्या शनिवारी 11 जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती. शनिवारी रात्रीच दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ऐश्वर्या आणि आराध्याला कोरोनाला संसर्ग झाल्याचं रविवारी (12 जुलै) समोर आलं होतं. मात्र, या दोघींमध्येही कोरोनाची लक्षणं नसल्याने त्यांना घरीच आयसोलेट करण्यात आलं होतं.

मात्र, या दोघींना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आता रुग्णालयात उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानं ऐश्वर्या आणि आराध्या यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies