पंतप्रधान मोदींनी कलाकारांसोबत साधला संवाद, गांधी विचारांबाबत केली चर्चा

या कार्यक्रमानंतर पीएमओच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन देखील सहभागी कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नवी दिल्ली | महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षांच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून अनेक विशेष उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी चित्रपटसृष्टीतील विविध दिग्गज कलाकारांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 लोकार्पण मार्गावरील निवासस्थानी या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी अनेक कलाकारांसोबत चर्चा केली.

यावेळी पंतप्रधानांसोबत अभिनेता शाहरुख खान, आमिर खान दोन खान मंडळींसह जॅकी श्रॉफ, अभिनेत्री कंगना रनौत, जॅकलिन फर्नांडिस, निर्माता-दिग्दर्शक एकता कपूर, बोनी कपूर, राजकुमार हिरानी, अनुराग बसू, इम्तियाज अली, आनंद एल. राय यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या या मंडळींनी गांधींचा विचार लोकांपर्यंत कसा उत्तमरित्या पोहचवला जाईल याबबतच्या सूचना देखील मांडल्या. चित्रपट सृष्टितील कलाकारांकडून विविध माध्यमांतून गांधीजींच्या विचारांचा प्रसार करण्याचे होतेय अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपट सृष्टितील पाहुण्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमानंतर पीएमओच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन देखील सहभागी कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या अकाउंटवर त्यांचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies