जयललितांच्या बायोपिकमधील कंगनाचा लूक आउट, सोशल मीडियावर खिल्ली

प्रेक्षकांना हा लूक पसंत पडलेला नसल्याचे दिसत आहे.

मुंबई | कंगना रनोट सध्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्य बायोपिकमुळे चर्चेत आहे. हा सिनेमा बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. कंगना सध्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच कंगनाच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. तिच्या चित्रपटाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये कंगनाच्या लूकची झलक पाहायला मिळतेय. मात्र प्रेक्षकांना हा लूक पसंत पडलेला नसल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर या लूकची खिल्ली उडवली जात आहे.

ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यामध्ये कंगना जयललिता यांच्या भूमिकेत दिसत आहे. यामध्ये तिने हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले आहे. तरण आदर्श यांनी चित्रपटाचा टीजर शेअर केला आहे. या चित्रपटाचे नाव थलाइवी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विजय यांनी केले आहे. तर विष्णू इंदुरी आणि शैलेश आर सिंह यांची निर्मिती असलेला हा चित्रपट आहे. 26 जून 2020 रोजी चित्रपट रिलीज होणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies