तुमच्यात हिम्मत असेल तर दाऊदचं घर तोडून दाखवा - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

दाऊदचं घर सोडून तुम्ही कंगनाचं घर का तोडलं असा थेट सवाल फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे

नवी दिल्ली । अभिनेत्री कंगना रणौतचं मुंबईतील पाली हिल्स येथील कार्यालय मनपाने तोडल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. कंगना आणि शिवसेनेत ट्विटर युद्ध सुरू असतांना आता भाजपने या प्रकरणात उडी मारली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी कंगनाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाना साधला आहे. 'दाऊदचं घर सोडून तुम्ही कंगनाचं घर का तोडलं' 'दाऊदचं घर तोडायला तुमच्यात हिम्मत नाही' असा थेट सवाल फडणवीसांना शिवसेनेसमोर उपस्थित केला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, "ठाकरे सरकारचं युद्ध कोरोनाशी नव्हे तर कंगनाशी आहे. म्हणुनच कंगनाचं घर तोडने, तिला धमक्या देणे असे काम ठाकरे सरकार करत आहे. 'जेवढी ताकद तुम्ही कंगनावर लावली तेवढी ताकत जर कोरोनावर लावली तर कदाचित कोरोना तरी कमी होईल." असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. दरम्यान, सुशांत सिंह राजपुत मृत्यु प्रकरणी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचा उत्तर देत फडणवीसांनी सांगितले की, ज्या प्रकारे ड्रग्सची सत्यता समोर आली आहे. त्याचप्रमाणे सुशांत प्रकरणाची सत्यता सुद्धा समोर येईल. असे फडणवीसांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies