आमिर, ऐश्वर्या, प्रियंकासह जगभरातील 85 सेलिब्रिटी Facebook वर सादर करणार Live Performance

यामध्ये 85 हून अधिक सेलेब्ज एकत्र येणार आहेत.

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी पॉपस्टार लेडी गागाच्या कोरोना व्हायरससाठीचा रिलीफ कॉन्सर्ट, 'वन वर्ल्डः टुगेदर अॅट होम' साठी जगभरातील अनेक कलाकार एकत्र आले होते. आता भारतामध्ये देखील हा प्रयोग केला जाणार आहे. रविवारी 20 वर्षे जुना चॅरिटी इव्हेंट प्लॅटफॉर्म 'गिव इंडिया' च्या माध्यमातून आज रविवारी 3 मे रोजी फेसबुक वर एक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. या कॉन्सर्टचे नाव ‘आय फॉर इंडिया’असे आहे. यामध्ये 85 हून अधिक सेलेब्ज एकत्र येणार आहेत. या मैफिलीचा हेतू कोरोना विषाणू पीडितांसाठी निधी गोळा करणे हा असणार आहे. यासोबतच घरी असलेल्या लोकांचे मनोरंजन करणे हा देखील हेतू असणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, करण जोहर, जोया अख्तर, माधुरी दीक्षित, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, अर्जुन कपूर, रणवीर सिंह, हृतिक रोशन, अरिजीत सिंग, दिलजीत दोसांझ, सिद्धार्थ मल्होत्रा, एआर रहमान, आयुष्मान खुरानासह इतर अनेक बॉलिवूड कलाकारांचा सहभाग असणार आहे. यासोतबच या कार्यक्रमात जोनास ब्रदर्स, मिंडी कलिंग, विल स्मिथ आणि ब्रायन अ‍ॅडम्ससारखे हॉलीवूड स्टार देखील सहभागी होणार आहेत.

कोरोना व्हायरसविरुद्धच्या संकटात निधी गोळा करण्यासाठी सेलेब्ज त्यांच्या घरातून छोटे छोटे परफॉरमन्स फेसबुकच्या माध्यमातून देणार आहेत. या कार्यक्रम 3 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजता https://www.facebook.com/facebookappIndia/ या पेजवर सुरू होणार आहे. चार तासांची ही मैफील असणार आहे. या मैफलीमध्ये 85 हॉलिवूड आणि बॉलिवूड स्टार्स परफॉर्मन्स देणार आहेत. गिव्ह इंडिया हा 20 वर्षे जुना डोनेशन प्लेटफॉर्म आहे. ज्याचे संस्थापक व्यंकट कृष्णन आहेत. हे व्यासपीठ 1250 हून अधिक स्वयंसेवी संस्थांना 13 लाखांहून अधिक देणगीदारांच्या माध्यमातून निधी प्रदान करते. ज्याचा उपयोग बर्‍याच सामाजिक कार्यात होतो. आता फेसबुकच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.AM News Developed by Kalavati Technologies