हृतिक रोशनचे आजोबा आणि प्रसिद्ध डायरेक्टर ओम प्रकाश यांचे निधन

हृतिक रोशन आपल्या आजोबांच्या खूप जवळ होता.

नवी दिल्ली | हृतिक रोशन यांचे आजोबा आणि प्रसिद्ध डायरेक्टर जे ओम प्रकार यांचे आज सकाळी निधन झाले. जे ओम प्रकाश 92 वर्षांचे होते. दीर्घकाळापासून ते आजारी होते. जे ओम प्रकाश हे हिंदी सिनेमांमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते होते. 'आप की कसम थी' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. यामध्ये राजेश खन्ना आणि अभिनेत्री मुमताज यांची प्रमुख भूमिका होती. जे ओमप्रकाश यांनी अनेक पंजाबी सिनेमे तयार केले यामध्ये 'आसरा प्यारा दा' सिनेमा सुपरहिट ठरला.

हृतिक रोशन आणि त्यांच्या कुटुंबासाठी ही दुःख गोष्ट आहे. त्यांनी आपल्या सर्वात जवळची आणि आवडती व्यक्ती गमावली आहे. हृतिक रोशन आपल्या आजोबांच्या खूप जवळ होता. तो मुलाखतींमध्ये नेहमी त्यांचा उल्लेख करत होता. सुपर 30 च्या प्रमोशनदरम्यान नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांने खुलासा केला होता की, त्याचे आजोबा हे सुपर टीचर आहेत.AM News Developed by Kalavati Technologies