हृतिक आणि दीपिका पहिल्यांदाच दिसणार एकत्र, ही ऐतिहासिक भूमिका साकारणार

दिग्दर्शक नितेश तिवारी आणि रवि उडयावर यांनी 'रामायणा'वर आधारित सिनेमाची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली | हृतिक रोशन सध्या यशाच्या शिखरावर आहे. त्याचा सुपर 30 सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. प्रेक्षकांनाही हा सिनेमा आवडला आहे. आता हृतिक रोशन दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचे वृत्त आहे. रामायण सिनेमात ते राम आणि सीतेची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या रुपाने एक नवीन जोडी बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये पाहायला मिळेल.

दिग्दर्शक नितेश तिवारी आणि रवि उडयावर यांनी 'रामायणा'वर आधारित सिनेमाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हा बिग बजेट सिनेमा 3डी स्वरुपात असणार आहे. फिल्म फेअरने दिलेल्या वृत्तानुसार निर्मात्यांनी भगवान रामाच्या भूमिकेसाठी हृतिक रोशनसोबत संपर्क साधला आहे. त्याने या बिग बजेट चित्रपटासाठी होकार दिला आहे. तर देवी सीतेच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणला दिग्दर्शकांनी निश्चित केले आहे. अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आला नसला तरी लवकरच चित्रपटाबाबत घोषणा करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.AM News Developed by Kalavati Technologies