'तो' ट्विट कंगनाला पडला महागात; कंगनावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने दिले आदेश

कृषी विधेयकावर कंगना पंतप्रधान मोदींच्या ट्विटला रिट्विट करत, त्यामध्ये आतंकवादी असा उल्लेख केल्याने कंगनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कर्नाटक न्यायालयाने दिले आहे

नवी दिल्ली । अभिनेता सुशांत सिंह प्रकरणानंतर चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौत आता आणखी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर कंगनावर गुन्हा दाखल करा. असे आदेश कर्नाटकातील तुमकुर न्यायालयाने पोलीसांना दिले आहे. त्यानंतर आता कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल केली जाणार आहे. याचिकाकर्ते रमेश नाईक यांनी कंगनाने केलेल्या वक्तव्यावर न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या मते कंगनाने शेतकऱ्यांचं अपमान केलं असून, तिच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी याचिका त्यांनी न्यायालयात दाखल केली होती.

दरम्यान, केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर राज्यसभेत कृषी विधेयके मंजूर केली, त्यानंतर देशभरातून मोदी सरकारविरुद्ध शेतकरी तसेच विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत सांगितले होते ही, देशातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केलं जात आहे. त्यानंतर त्या ट्विटला रिट्विट करत कंगनानं या प्रकरणात उडी मारली होती. त्यांमध्ये तिने आतंकवादी शब्दाचा उल्लेख केला होता. त्या पार्श्वभुमीवर न्यायालयाने कंगनावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश पोलीसांना दिले आहे.AM News Developed by Kalavati Technologies