प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचे निधन; वयाच्या 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुलाचं मुत्रपिंड निकामी झाल्याने निधन झालं आहे

मुंबई । जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल यांचे आज पहाटे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्यला मूत्रपिंडाचा त्रास जावणत होता. मुत्रपिंड निकामी झाल्याने आज पहाटे मुंबईत आदित्यने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 35 व्या वर्षी आदित्याचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अचानक आदित्यचा मृत्यू झाल्याने पौडवाल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आदित्य पौडवाल यांच्या निधनाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. महादेवन यांनी आदित्यच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित ते म्हणाले, "ही बातमी ऐकून मी पूर्णपणे कोसळलो आहे. आमचा लाडका आदित्य पौडवाल आता आपल्यात राहिला नाहीत. तो प्रतिभावान संगीतकार होता, एक सुंदर मनाचा माणूस होता. आम्ही अनेक प्रकल्पांमध्ये एकत्र काम केले. मी या धक्क्यातून सावरू शकत नाहीये. ईश्वर त्याच्या कुटुंबीयांना हे दु:ख पेलण्याचे बळ देवो! आदित्य... तू कायम आठवणीत राहशील." शंकर महादेवन यांच्या या पोस्टवर अनेक युजर कमेंट करत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies