उदयनराजेंकडून 'तानाजी'च्या टीमचे कौतुक, सोशल मीडियावर केली पोस्ट

चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 16 कोटींची कमाई केली आहे.

मुंबई | 'तानाजी - द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. आता माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही या चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले आहे. तसेच यापुढेही आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहाल अशी अपेक्षा करतो असेही ते म्हणाले आहेत.

चित्रपटात अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले. 10 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 16 कोटींची कमाई केली आहे. अजय देवगन सिनेमात महत्त्वाची भूमिका निभावतोय. त्याच्यासाठी हा चित्रपट खास आहे कारण अजय देवगनचा हा 100 वा सिनेमा आहे. यासोबतच अजय देवगन आणि काजोल तब्बल 10 वर्षांनंतर एकत्र काम करत आहे.

उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या चित्रपटाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की "तानाजी द अनसंग वॉरीयर" या चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच अजय देवगण यांची प्रशंसा करावी एवढी कमीच आहे. त्यांना पुढील वाटचालीस आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. तसेच यापुढेही ते आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील हीच अपेक्षा.' या ट्विटसह त्यांनी अजय देवगन, काजोल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकरला टॅग केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies