'दबंग 3'च्या संकटांमध्ये वाढ, ट्विटरवर #BoycottDabangg3 ट्रेंड

'दबंग 3' चित्रपटावर हिंदू जनजागृती समितीने आक्षेप नोंदवला आहे.

मुंबई | बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा दंबग 3 सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. मात्र त्यापूर्वीच चित्रपटावर मोठे संकट ओढावले आहे. सिनेमातील एका गाण्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यामुळे आज ट्विटरवर #BoycottDabangg3 असा ट्रेंड सुरू झाल्याचे पाहायला मिळतेय. दंबगच्या गाण्यातील काही दृष्यांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार करण्यात आली आहे. यामुळे दंबग 3 या सिनेम्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळतोय.

'दबंग 3' चित्रपटावर हिंदू जनजागृती समितीने आक्षेप नोंदवला आहे. हिंदू जनजागृती समितीचा आरोप आहे की, या चित्रपटाचे टायटल साँग 'हुड दबंग दबंग'ने त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. 'दबंग 3' या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी काही दिवसांपूर्वी रिलीज झाले. येत्या 20 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होत आहे. पण दरम्यान रिलीज होण्यापूर्वीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाबाबत सध्या वाद सुरू आहे. हा वाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चित्रपटातील एका गाण्यामुळे हा वाद वाढला आहे. मेकर्सनी या गाण्यातून हिंदू धर्मियांच्या भावनांना ठेच पोहोचवल्याचा आरोप केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमान खानच्य़ा दबंग सिनेमाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं कोणतही सर्टिफिकेट देऊ नये, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आली आहे.

हेही वाचाAM News Developed by Kalavati Technologies