बॉलिवूडचा धोनी हरपला; 'पवित्र रिश्ता' पासून तर 'एम एस धोनी' पर्यंत, असा आहे सुशांतचा थक्क करणारा प्रवास

‘एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड क्षेत्रात आपली छाप पाडली होती.

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईच्या वांद्रे येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेचा उलगडा झाल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या सुशांतने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात एका छोट्या पडद्यावरून केली होती. आणि त्यानंतर मोठ्या पडद्यावर त्याने महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘एमएस धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड क्षेत्रात आपली छाप पाडली होती.

अशी झाली छोट्या पडद्यावरची सुरूवात 

सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीवर केली होती पण फार थोड्या लोकांना माहिती आहे की त्याने करिअरच्या सुरूवातीला बैकग्रांउड डांन्सर म्हणून काम केले होते. 2008 मध्ये स्टार प्लसच्या 'किस देश है मेरा दिल' या शोमध्ये मधून कारकीर्दीची सुरूवात केली. 2010 मध्ये सुशांत जरा नचके दिखा या रियालिटी टीव्ही शोमध्ये दिसला. यानंतर, 2010 मध्ये तो रियालिटी टीवी शो "झलक दिखला जा" चौथ्या सीझनमध्ये दिसला होता. एकता कपूरची पवित्र रिश्ता या मालिकेतून सुशांतला छोट्या पडद्यावर सर्वाधिक लोकप्रियता मिळाली होती.

असे ठेवले बॉलिवूडमध्ये पाऊल

सुशांतसिंह राजपूतने 2013 मध्ये रिलीज झालेल्या "काय पो छे" या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यावर्षी तो ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातही दिसला होता. 2014 साली सुशांत अनुष्काचा प्रियकर म्हणून आमिर खानचा स्टार चित्रपट पीकेमध्ये दिसला होता. सुशांतचा ‘डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी’हा चित्रपट वर्ष 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता.

2016 मध्ये रिलीज झालेल्या "एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी" या बायोपिक चित्रपटातून सुशांत सिंग राजपूतला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिक चित्रपटात काम केल्याबद्दल सुशांतची प्रशंसा झाली. यानंतर सुशांत राब्ता, वेलकम टू न्यूयॉर्क, केदारनाथ, सोनचिडिया आणि छिचोरे या चित्रपटांमध्ये दिसला.

सुशांतच्या जीवनातील पुरस्कार

नुकताच सुशांतसिंग राजपूतचा ड्राईव्ह हा चित्रपट रिलीज झाला होता, ज्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि त्याचा 'दिल बेचरा' हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही. सुशांतच्या कारकीर्दीचा आलेख खराब होत नव्हता आणि आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांनी इंडियन टेलिव्हिजन अ‍ॅकॅडमी अवॉर्ड्स, बिग स्टार एंटरटेनमेंट अवॉर्ड, आर्टिस्ट अ‍ॅवॉर्ड आणि स्क्रीन अवॉर्ड जिंकला होता.AM News Developed by Kalavati Technologies