आजाराचे निदान झाल्यावर इरफान खानने शेअर केले होते हे भावनिक पत्र

...तो म्हणाला तुमचे स्टेशन आले आहे. कृपया खाली उतरा

मुंबई | अभिनेता इरफान खान यांच वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं. इरफान खानवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. काल मंगळवारी त्याची प्रकृती बिघडली होती. यामुळे त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र कॅन्सरशी झुंज देणाऱ्या या अभिनेत्याची झुंज आज अपयशी ठरली. बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान दोन वर्षांपूर्वी त्याला न्यूरोएंडोक्राइन कॅन्सर झाल्याचं निदान झालं होते. या आजाराची माहिती मिळाल्यावर त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पत्र शेअर केले होते.

'काही दिवसांपूर्वी अचानक माहित झाले, की मला न्यूरोएंडोक्राइन कॅन्सर आहे. हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला होता. जेव्हा या दुर्धर आजाराबाबत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कळाले, की या आजारावर जास्त उपचार नाहीये. याबाबत जास्त माहितीदेखील उपलब्ध नव्हती. हा एक दुर्मिळ आजार आहे. त्यामुळे याच्यावर उपचार होऊ शकतील की नाही याची निश्चितता नाहीये. मी आतापर्यंत भरधाव ट्रेनने प्रवास करत होतो. माझे काही स्वप्न होती, काही योजना होत्या, काही इच्छा होत्या, काही ध्येय होती. परंतु मला कुणीतरी हलवून जाग केल. मी मागे वळून पाहिले तेव्हा तो टीसी होता. तो म्हणाला तुमचे स्टेशन आले आहे. कृपया खाली उतरा. मी गोंधळलो होतो. मी म्हणालो, नाही, नाही माझं स्टेशन अजून आलाच नाहीये. तो म्हणाला, नाही, तुम्हाला पुढच्या एका स्टॉप उतरावच लागेल. आयुष्याचदेखील असच असते.'AM News Developed by Kalavati Technologies