आता विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर येणार सिनेमा, या अभिनेत्याला मिळाली परवाणगी

सिनेमाचे शूटिंग जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि आग्रा येथे होणार आहे.

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर बालाकोट एअरस्ट्राइक करण्यात आला. यावेळी अभिनंदन यांनी धाडसाने काम केले. यामुळेच प्रसिद्ध झालेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान देशासाठी हिरोपेक्षा कमी नाही. पाकिस्तानच्या तावडीतून सुटल्यामुळे आणि धाडसाने काम केल्यामुळे त्यांना भारत सरकारकडून वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. आता बॉलिवूडमध्येही भारतीय जवानांना ट्रिब्यूट देण्यासाठी एक सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमात अभिनंदन यांच्या योगदानाचाही उल्लेख असणार आहे. बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांना हा सिनेमा बनवण्यासाठी परवाणगी मिळाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार बालाकोट स्ट्राइकवर सिनेमा बनवण्यासाठी विवेक ओबेरॉय यांनी परवाणगी घेतली आहे. सिनेमाचे शूटिंग जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि आग्रा येथे होणार आहे. शूटिंगची सुरुवात 2020 मध्ये होण्याची शक्यता आहे. तीन भाषांमध्ये सिनेमा बनवण्यात येईल. सिनेमाविषयी बोलताना विवेक ओबेरॉय म्हणाला की, एक प्राउड इंडियन, एक देशभक्त आणि सिनेमांशी जोडले गेलो असल्यामुळे भारतीय सैन्य किती सक्षम आहे हे दाखवणे आमचे कर्तव्य आहे. या सिनेमामुळे आपण इंडियन आर्मी आणि जांबाज विंग कमांडर अभिनंदन यांचे कार्य पाहू शकतो.

त्यांनी सांगितले की, अभिनंदन पाकिस्तानात गेल्यानंतर त्यांनी खूप त्रास सहन केला. ते धिराने राहिले आणि नीटनेटके परत आले. या सर्व गोष्टी लोकांना दाखवण्यासारख्या आहेत. बालाकोट स्ट्राइक ही भारत सरकारकडून झालेली एक नियोजित एअर स्ट्राइक होती. IAF ने आमच्यावर विश्वास ठेवला आहे यामुळे त्यांचे आभार मानतो. आशा आहे की, सिनेमाला आम्ही योग्य न्याय देऊ शकू.

2019 च्या सुरुवातीला विवेक ओबेरॉयने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिक सिनेमात मोदींची भूमिका साकारली होती. मात्र बॉक्स ऑफिसवर सिनेमा काही खास चालला नाही. मात्र या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा असतील. लोक स्क्रीनवर रिअर हीरो विंग कमांडर अभिनंदन यांना पाहून आनंदी होतील.AM News Developed by Kalavati Technologies