मोठी बातमी! रियाला मोठा दणका; कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज

रिया आणि तिचा भाऊ शौविकसह आणखी चार जणांचा जामीन अर्ज सुप्रिम कोर्टाने फेटाळला आहे

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग घेतल्याची कबुली दिल्यानंतर रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकला अटक करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने रिया आणि शौविकचा जामीन अर्ज फेटाळला असून, त्यामुळे रिया चक्रवर्ती आणि शौविकला पुन्हा एकदा मोठा धक्का लागला आहे. रियाला 22 सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीतच राहावे लागणार आहे.

न्यायाधीश जीबी गुराव यांनी गुरूवारी रिया आणि तिचा भाऊ शौविक तसेच आणखी चार जणांचा जामीन अर्ज फेटाळून काढला आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयात रिचा चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि अन्य चौघांच्या जामिनाच्या अर्जांवर आज म्हणजेच शुक्रवारी निकाल देण्यात आला. दरम्यान, ड्रग अँगलचा तपास करतांना नारकोटिक्स पथकाने रिया आणि तिच्या भावासह आणखी चार जणांना अटक केली होती. तेव्हापासून रिया एनसीबीच्या पोलीस कोठडीतच आहे.AM News Developed by Kalavati Technologies