आशुतोष गोवारीकरांच्या 'पानिपत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा थरार या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

मुंबई | दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत’ सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेमध्ये अर्जुन कपूर, पार्वतीबाईंच्या भूमिकेत क्रिती सेनन तर अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेमध्ये संजय दत्त पाहायला मिळणार आहे. अजय- अतुल यांचं संगीत असलेला हा सिनेमा 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

हरयाणा मधील कर्णाल जिल्ह्यातील पानिपत हे ऐतिहासिक स्थळ आहे. 'हर हर महादेव'चा जयघोष करत हत्ती, घोडे, तोफांनी सज्ज असलेल्या मराठा फौजा आणि समोर अनुभवी आणि कुशल सेनानी अहमद शहा अब्दाली आणि त्याची फौज.... मराठ्यांचा इतिहास भव्य - दिव्य रूपात पडद्यावर मांडणारा सिनेमाचा ट्रेलर पाहून अंगावर शहारे उभे राहतात. सिनेमाचा ट्रेलर पाहताना बाजीराम मस्तानी या सिनेमाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. संजय दत्त दमदार भूमिका साकाराताना या ट्रेलरमध्ये दिसतोय. 

अर्जुन कपूर, क्रिती सेनन आणि संजय दत्त यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला. यानंतर सिनेमाचा ट्रेलर कसा असेल यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. ‘पानिपत’ या ऐतिहासिक महानाट्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा थरार या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 'मराठा... भारत भूमीचे असे शूर योद्धा ज्यांचा धर्म आणि कर्म केवळ शौर्य आहे.' असं म्हणत या ट्रेलरची सुरुवात करण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies