चेन्नई | प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या मातोश्री करीमा बेगम यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांतील निकटवर्तीयांनी दिली. यानंतर रहमान यांनी ट्विटरवरुन आईचा फोटो शेअर केला. करीमा बेगम यांच्या निधनाचे वृत्त समजताच तामिळनाडूचे मुख्ममंत्री के. पलानीस्वामी व द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॉलिन यांनी शोक व्यक्त केला. दीर्घ आजारामुळे संगीतकार ए. आर. रहमान यांच्या आई करीमा बेगम यांच्या निधनाची बातमी ऐकून आपल्या अत्यंत दु:ख झाल्याचे एका ट्विटद्वारे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी रहमान व त्यांच्या दु:खी कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली. तमिळ चित्रपटापासून ते जागतिक पातळीवरील रहमान यांच्या संगीत क्षेत्रातील प्रवासात त्यांच्या आईची अत्यंत महत्तवाची भूमिका असल्याचे नमूद करत स्टॅलिन यांनी करीमा बेगम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. संगीतकार थमान, देवश्री प्रसाद यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक लोकांनी रहमान त्यांच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

— A.R.Rahman (@arrahman) December 28, 2020