आता क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी 'अनुष्का'ही खेळणार क्रिकेट, 'हे' आहे कारण

यापूर्वी ती 2018 मध्ये 'झिरो' चित्रपटात दिसली होती.

नवी दिल्ली | बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र आता ती लवकरच क्रिकेट खेळताना दिसणार आहे. क्रिकेटपटू विराट कोहलीची अनुष्का लवकरच एका क्रिकेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत आहे. यामध्ये अनुष्का शर्मा प्रमुख भूमिका साकारणार आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. अनेक खेळाडूंवर आजपर्यंत अनेक सिनेमे तयार करण्यात आले आहेत. महेंद्रसिंग धोनी, मिल्खासिंग, मेरी कोम यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. यानंतर आता क्रिकेटर झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अनुष्का शर्मा बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. यापूर्वी ती 2018 मध्ये 'झिरो' चित्रपटात दिसली होती. मात्र हा सिनेमा यशस्वी होऊ शकला नव्हता. यामध्ये तिच्यासोबत शाहरुख खान आणि कतरिना कैफची महत्त्वाची भूमिका होती. यानंतर अनुष्का शर्मा कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही.

View this post on Instagram

????Queen @anushkasharma With [email protected] At Eden Gardens tonight ????????❤????

A post shared by Anushka Sharma Universe (@anushkauniverse_) onAM News Developed by Kalavati Technologies