'या' अभिनेत्रीला मुंबई पोलिसांनी केलं होतं ब्लॉक, अमृता फडणवीसांच्या सांगण्यावरुन केलं अनब्लॉक

. 'मुंबई पोलिसांनी मला ब्लॉक का केलं आहे…

मुंबई | अभिनेत्री पायल रोहतगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करुन ही नेमीच चर्चेत असते. यावेळी तिने वादग्रस्त पोस्ट केलेली नाही तर ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मुंबई पोलिसांनी मला ब्लॉक केल्याचं ट्विट तिने केलं होती. या ट्विटमध्ये तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना टॅगही केलं होतं. यानंतर अमृता फडणवीसांनी तिची मदत केली आहे.

तिच्या या पोस्टनंतर अमृता फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यांच्या सांगण्यावरुन मुंबई पोलिसांनी पायलला अनब्लॉक केल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पायलने तिला मुंबई पोलिसांनी ब्लॉक केल्याचा स्क्रीन शॉट शेअर केला होता. 'मुंबई पोलिसांनी मला ब्लॉक का केलं आहे…'मुंबई पोलिसांच्या या पक्षापातानंतर आता मला भारतात राहण्याची भीती वाटू लागली असल्याचे तिने पोस्टमध्ये लिहिले होते. ही पोस्ट तिने अमृता फडणवीस यांना टॅग केली होती.

तिच्या या पोस्टची अमृता फडणवीस यांनी दखल घेतली. त्यांनी मध्यस्थी करत एक पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग केले होतं. त्यांच्या या पोस्टनंतर मुंबई पोलिसांनी पायलला अनब्लॉक केल्याचं सांगण्यात येत आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या की, 'एखादा नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून जर त्याचे मत व्यक्त करत असेल, (..आणि ज्याने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जात नसतील) तर अशा नागरिकाला सार्वजनिक संस्थेने ब्लॉक करणे योग्य नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणी लक्ष द्यावेट'.. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या या ट्विटची दखल मुंबई पोलिसांनी घेतली.

अमृता फडणवीसांच्या ट्विटला मुंबई पोलिसांनी रिट्विट केलं. त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले. 'मुंबई पोलीस प्रत्येक नागरिकाच्या पाठिशी नेहमीच उभे राहिले आहेत, पायल रोहतगीचे ट्विटर अकाऊंट सुरु असून आम्ही कोणत्याही नागरिकाशी संवाद तोडत नाही. याप्रकरणी आमची टीम नेमकं काय झालं आहे, याचा शोध घेत आहे', असे मुंबई पोलिसांनी सांगितलं.



AM News Developed by Kalavati Technologies