या बॉलिवूड अभिनेत्याला ओळखले का? 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमातील लूक

नवरात्रीच्या मुहूर्तावर अक्षय कुमारने या सिनेमातील पहिला लूक शेअर केला आहे.

मुंबई | बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हणून ओळख असलेला आपल्या सर्वांचा लाडका हिरो म्हणचे अक्षय कुमार. अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'अॅक्शन हिरो' म्हणून ओळखला जाणारा अक्षय गेल्या काही वर्षांत वेगळ्या धाटणीच्या भूमिकांमध्ये दिसत आहे. यामधील एक भूमिका म्हणजे 'लक्ष्मी बॉम्ब' मधील होय. अक्षय या चित्रपटात एका तृतीयपंथीयाची भूमिकेत दिसणार आहे. त्याचा या चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे. यामध्ये त्याला ओळखणेही कठीण झाले आहे.

नवरात्रीच्या मुहूर्तावर अक्षय कुमारने या सिनेमातील पहिला लूक शेअर केला आहे. 'नवरात्री म्हणजे तुमच्या आत असलेल्या शक्तीपुढे नतमस्तक होणं होयं. या शुभ मुहूर्तावर मी लक्ष्मीचा पहिला लूक तुमच्यासमोर आणत आहे. ही भूमिका साकारताना मी उत्सुकही होतो आणि मला भीतीही वाटत होती. मात्र जेव्हा तुम्ही चौकट मोडता तेव्हाच नव्या आयुष्याला सुरूवात होते', असं अक्षयनं त्याचा ट्विटमध्ये लिहिले आहे. अक्षयसाठी ही भूमिका चाकोरीबाहेरची आहे. मात्र त्याने हे आव्हान स्वीकारले. यासाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. हा चित्रपट दक्षिणेतल्या गाजलेल्या हॉरर कॉमेडी चित्रपट 'कंचना'चा हा रिमेक आहे. राघव लॉरेन्सने या चित्रपटाचे दिग्दर्शन असतील. अक्षयसोबत किआरा अडवाणीही या सिनेमात असणार आहे. 5 जून 2020 ला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies