अक्की साकारणार 'पृथ्वीराज चौहान', वाढदिवशी शेअर केला टीझर

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अक्षय कुमारने या चित्रपटाचा अनाउन्समेंट टीझर पोस्ट केला आहे.

मुंबई | बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. आज त्याने वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांना आपल्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले आहे. आज त्याच्या वाढदिवशी त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. तो महान राजपूत योद्धे पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमात भूमिका साकारताना दिसणार आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अक्षय कुमारने या चित्रपटाचा अनाउन्समेंट टीझर पोस्ट केला आहे. यशराज फिल्मसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी असणार आहेत. पुढल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies