बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का; जेष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन...

मदर इंडिया, कोहिनूर अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये कुमकुम यांनी साकारली होती महत्वाची भुमिका

मुंबई । अभिनेत्री कुमकुम यांचा वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. एकेकाळी मुंबईतील लिंकींग रोडवरील त्यांच्या बंगल्याचा नाव सुद्धा कुमकुम होते. त्यावरून त्यांनाही 'कुमकुम' असे नाव पडले. 22 जुलै 1934 रोजी कुमकुम यांचा जन्म बिहारच्या शेखपुरा या गावी झाला होता. त्यांचे मुळ नाव 'जैबुनिस्सा' असे होते. कुमकुम यांनी आपल्या पहिला चित्रपट "गंगा मैया तोहे पियारी चढ़ाईबो" (1963) या भोजपुरी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

त्याचबरोबर त्यांनी मदर इंडिया, कोहिनूर, एक सपेरा एक लुटेरा आणि दौरा अशा प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी आपली महत्वाची भुमिका बजावली आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अभिनेता जॉनी वॉकरचा मुलगा नासिर खानने ट्विटवरून माहिती दिली आहे की, त्यांचा मृत्यू कसा झाला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.AM News Developed by Kalavati Technologies