पॉर्नोग्राफिक व्हिडीओ प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक, वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्नोग्राफी व्हिडीओ

मुंबई पोलीस प्रॉपर्टी सेलने मोठी करवाई केली असून, त्यांनी मिस आशिया बिकीनी अवॉर्ड मिळालेल्या गहाना वरिष्ठ हिला अटक केली आहे

मुंबई । मुंबई पोलीस प्रॉपर्टी सेलने मोठी कारवाई केली आहे. अभिनेत्री गहाना वरिष्ठला अटक करण्यात आली आहे. वेबसाईटवर पॉर्न व्हिडीओ शूट करून अपलोड करण्याच्या आरोपावरून तिला अटक करण्यात आली आहे. प्रॉपर्टी सेलने सुरुवातीला रेड टाकली त्यानंतर, विचारपूस केल्यानंतर गहानाला अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी गहानाला मुंबई न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस अन्य मॉडेल्स, साईड अॅक्टर्स तसेच आणखी काही प्रोडक्शन हाऊसवर मोबाईल अॅप्स आणि वेबसाईटवर पॉर्न व्हिडीओ अपलोड प्रकरणी पोलीसांना संशय आहे.

कोण आहे गहाना वरिष्ठ

गहाना वरिष्ठला मिस आशिया बिकीनीचा अवॉर्ड मिळाले असून, तिने जाहीरात, हिंदी आणि तेलुगु चित्रपटांमध्येही आपली भुमिका बजावली आहे. पोलीसांनी सांगितले की, गहानाने 87 अश्लील पॉर्न व्हिडीओ तयार करून आपल्या वेबसाईटवर अपलोड केले आहे. ते व्हिडिओ पाहण्यासाठी त्या वेबसाईटचा सदस्य होणे अनिवार्य आहे. त्यासाठी प्रत्येक सदस्याला दोन हजार रुपये भरावे लागत होते. पोलीसांनी सांगितले की, मलाड-मालवानी परिसरात ग्रीन पार्क नावाच्या एका बंगल्यात हा व्यवसाय सुरु होता. त्यात दोन पुरुष, एक लाईट मॅन, एक महिला फोटोग्राफर आणि एक ग्राफिक्स डिझायनर यांचा समावेश होता. सोबतच पोलीसांनी घटनास्थळावरून एचडी कॅमेरा, सहा मोबाईल, एक लॅपटॉप, ट्रायपॉड, व्हिडिओ क्लिपची मेमोरी जप्त केली आहे.

काय आहे प्रकरण

चित्रपटात नवीन चेहऱ्यांनी संधी म्हणून ही टोळी चित्रपटासाठी कलाकार पाहिजे अशी जाहीरात प्रसिद्ध करायचे. त्यानंतर अश्लील सीन्स करून, त्यांना जास्त पैशांची लालूच देऊन त्यांच्यासोबत पॉर्न व्यवसायासाठी अॅग्रिमेंट केले जायचे. त्यानंतर पॉर्न क्लिप तयार करून त्याला सोशल मीडिया आणि वेबसाईटवर अपलोट करून ही टोळी पैसा कमवत होती. पोलीसांनी ह्या टोळीचे तीन बँक खाते जप्त केले असून, त्यात 36 लाख रुपयेAM News Developed by Kalavati Technologies