अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

वांद्र्याच्या घरात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे.

मुंबई | एम एस धोनी चित्रपटातून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ पाडणाऱ्या सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. वांद्र्याच्या घरात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याची प्राथामिक माहिती मिळते आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या घरी कामाला असलेल्या नोकराने ही माहिती दिली आहे. सुशांत सिंग यांनी आत्महत्या का केली याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

सुशांत बॉलीवूडचा खूप लोकप्रिय अभिनेता होता. टीव्ही अभिनेता म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सर्वप्रथम त्याने 'किस देश में है मेरा दिल' नावाच्या मालिकेत काम केले पण त्यांना एकता कपूर सोबत पवित्र रिश्ता या मालिकेपासून खरी ओळख मिळाली होती. त्यानंतर त्याने  चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले.  'काय पो छे'  या चित्रपटात तो मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला आणि त्याच्या अभिनयाचेही कौतुक केले.

यानंतर तो वाणी कपूर आणि परिणीती चोप्रासोबत शुद्ध देसी रोमांन्समध्ये दिसला. त्यानंतर त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारून बॉलिवुड क्षेत्रात छाप पाडली होती.  सुशांतच्या कारकीर्दीतील हा पहिला असा चित्रपट होता ज्याने शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. सुशांत सोनचिडिया आणि  छिछोरे सारख्या चित्रपटांमध्येही दिसला होता. त्यांचा शेवटचा चित्रपट केदारनाथ होता ज्यात तो सारा अली खान सोबत दिसला होता.

महत्त्वाचे म्हणजे अलीकडच्या काळात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या जगाला निरोप दिला आहे. इरफान खान आणि ऋषि कपूर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचा एप्रिल महिन्यात मृत्यू झाला. नुकतेच गायक आणि संगीतकार वाजिद खान यांचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले. याशिवाय ज्येष्ठ गीतकार योगेश गौर यांनीही गेल्या महिन्यात या जगाला निरोप घेतला होता.



AM News Developed by Kalavati Technologies