मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्यासाठी कठोर पाऊल उचला , 49 दिग्गजांचे नरेंद्र मोदींना पत्र

लोकांना 'जय श्रीराम'च्या नावाखाली चिथावणी दिली जात आहे.

नवी दिल्ली | सध्या देशभरात मॉब लिंचिंगची प्रकरणं वाढली आहे. 'जय श्रीराम'चा नारा दिला नाही म्हणून अनेकांना मारहाण होणाऱ्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. आता या घटनांचा निषेध करत 49 दिग्गजांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यासोबतच विविध विचारसरणी हीच भारताची ताकद असल्याचे या पत्रात सांगण्यात आले आहे.

मारहाणीच्या घटना वाढल्या आहे. याविषयी विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. या पत्रावर रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप, शुभा मुद्गल, अपर्णा सेन, कोंकणा सेन शर्मा, अदूर गोपालकृष्णन, मनीरत्नम, अनुराग कश्यप, बिनायक सेन, सुमित्रो चॅटर्जी, अपर्णा सेन, रेवती, श्याम बेनेगल, रुपम इस्लाम, अनुपम रॉय, परमब्रता, रिद्धी सेन अशा सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते, कलाकारांचा समावेश आहे. लोकांना 'जय श्रीराम'च्या नावाखाली चिथावणी दिली जात आहे. दलित, मुस्लीम आणि वंचित समाजातील लोकांना मारहाण करून ठार मारले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या घटना रोखण्यासाठी तात्काळ कठोर पाऊल उचलावे अशी मागणी या पत्रामार्फत करण्यात आली आहे.

या पत्रात पुढे लिहिले आहे की, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी पाहून आम्हाला धक्का बसला आहे. 2016 मध्ये दलितांविरोधात हिंसाचाराच्या 840 घटना घडल्या. या घटना घडल्यानंतर आरोपींवर कोणतीही कारवाई होत नाही. कारवाई आणि दोषींना शिक्षा होण्याचे प्रमान अत्यंत कमी आहे. या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. 'तुम्ही संसदेत मॉब लिंचिंगच्या घटनांचा निषेध नोंदवला होता. पण तेवढं पुरेसे नाही,' असंही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies