आमिर खानचा नवा लूक व्हायरल, 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाच्या शूटिंग सेटवरुन फोटो लीक

हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्टर गंप' चा ऑफिशियल रिमेक 'लाल सिंह चड्ढा'ची शूटिंग सुरू आहे.

मुंबई | बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानचा नवा लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 'लाल सिंह चड्ढा' सिनेमातील त्याचा हा लूक आहे. आमिरच्या तुर्कीमध्ये राहणाऱ्या एका चाहत्याने आमिरचे सेटवरुन फोटो शेअर केले आहे. फोटोमध्ये आमिर टोपी घातलेला, मोठी दाढी आणि वाढलेल्या केसांमध्ये दिसतोय. हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्टर गंप' चा ऑफिशियल रिमेक 'लाल सिंह चड्ढा'ची शूटिंग सुरू आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूरचीही महत्त्वाची भूमिका आहे.

काही दिवसांपूर्वीच आमिर खानने 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटातील आपला फर्स्ट लूक पोस्ट केला होता. मोठे मोठे डोळे आणि तंदुरुस्त सरदारच्या रुपात तो दिसत होता. यानंतर नुकताच सेटवरुन एक फोटो लीक झाला आहे. यामध्ये आमिरची लांब दाढी आणि मोठे केस आणि टोपी घातलेला दिसत आहे.

लाल सिंह चड्ढा हा सिनेमा हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा ऑफिशियल हिंदी रिमेक आहे. ओरिजनल चित्रपटात मुख्य पात्र असलेल्या फॉरेस्टचा मेंदू कमी काम करत असतो. तरीही तो यश संपादन करतो आणि ऐतिहासिक पुरूष बनतो. मात्र त्याचे खरे प्रेम त्याला सोडून जाते. या चित्रपटाला ऑस्करचे 12 नॉमिनेशन मिळाले होते. तसे सहा ऑस्कर अवॉर्ड्स जिंकले होते. टॉम हँक्सला यासाठी सतत दूसरा बेस्ट अॅक्टर ऑस्कर अवॉर्ड मिळाला होता. हा चित्रपट लेख विन्सटन ग्रूमच्या 1986 मध्ये आलेल्या कादंबरीवर आधारित होता. हिंदी रिमेकमध्ये आमिर टॉम हँक्सची भूमिका साकारणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies