केरळमध्ये सचिनच्या पोस्टरवर ओतले काळे तेल; फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल

अमेरिका पॅापस्टार रिहाना व पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं या आंदोलनाबद्दल मत व्यक्त केलंय

मुबंई । गेल्या 73 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर उपोषण करत आहे. अमेरिका पॅापस्टार रिहाना व पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं या आंदोलनाबद्दल मत व्यक्त केल्यावर देशातील सेलिब्रिटी देखील व्यक्त होऊ लागले आहे. त्याच जागतिक पातळीवर नावजलेली रिहानाने ट्विट करुन कृषी कायद्याला समर्थर्नात पोस्ट केली होती. त्या ट्विटला प्रतिउत्तर देत सचिनने म्हटले होते की, 'भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही, बाहेरचा नागरीक देशाच्या अर्तगत विषय भाष्य करु शकत नाही.

भारतीयांना माहिती आहे आणि ते निर्णय घेईल, असं ट्विट केल्या नंतर कृषी कायद्यावर भाष्य करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरसह सर्वच सेलिब्रिटींवर टिका होऊ लागली आहे. मागील 73 दिवसापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही?, इतके दिवस कुठे होता?  असा प्रश्न लोक करु लागले आहेत.

त्याच केरळमधील युवक काँग्रेसनं थेट रस्त्यावर येत सचिन विरोधात निदर्शनं केली. सचिनच्या पोस्टरवर काळे तेल ओतून त्याचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर ट्विटर वरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधंलाय. 'केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपुर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचा अभिमान असलेले सचिन तेंडुलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?, ' असा प्रश्न त्यांनी केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies