ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचा 'अल्झायमर'शी लढा, मुलगा अजिंक्यने केले भावुक ट्विट

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर या आजरानं ग्रासलं असून, याबाबत त्यांचा मुलगा अजिंक्यने ट्विट करत माहिती दिली आहे

मुंबई । मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना ‘अल्झायमर’ या आजाराने ग्रासलं आहे. त्यांचा मुलगा, अभिनेते अजिंक्य देव यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. अजिंक्य देव यांनी ट्विट करत सांगितले आहे की, 'माझी आई श्रीमती. मराठी चित्रपटसृष्टीची सीमा देव अल्झायमरने ग्रस्त आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, आम्ही तिच्यावर खूप प्रेम करतो. त्यांची तब्येत चांगली राहावी याकरता संपूर्ण देव कुटुंबीय प्रार्थना करत आहेत, ज्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी त्यांच्यावर प्रेम केलं त्यांनीही त्यांच्याकरता प्रार्थना करावी.' असे आवाहन अजिंक्य देव यांनी केले आहे.

केवळ मराठीच नाही, तर सीमा देव यांनी हिंदी चित्रपट सृष्टीदेखील तितकीच गाजवली. अनेक दशके त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. रमेश देव यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट खूप गाजले. वयाच्या 78 व्या वर्षीही त्या मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांना अल्झायमर या आजारानं ग्रासल्याची माहिती मुलगा अजिंक्य देव यांनी ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली.AM News Developed by Kalavati Technologies