होंडाच्या कारवर 4 लाखांची सूट, 30 सप्टेंबरपर्यंत ऑफर

याशिवाय जुन्या कार एक्स्चेंज करूनही अतिरिक्त सूट घेतली जाऊ शकते.

उत्सवांचा हंगाम सुरू होणार आहे. यासाठी प्रसिद्ध कारनिर्मात कंपनी होंडाने त्यांच्या चारचाकींवर तब्बल 4 लाख रुपयांपर्यंत सूट देऊ केली आहे. याशिवाय जुन्या कार एक्स्चेंज करूनही अतिरिक्त सूट घेतली जाऊ शकते. तथापि, कंपनीच्या सर्व ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत वैध आहेत. चला तर मग या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया..

होंडा अमेझ
होंडाच्या या कारला एकूण 42 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार नवीन कार खरेदीवर 12000 रुपयांची वाढीव वॉरंटी उपलब्ध होईल. याशिवाय होंडा केअर मेंटेनन्स प्रोग्रामही 3 वर्षांसाठी 16000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्याच वेळी जुन्या कारच्या एक्सचेंजवर चौथ्या आणि 5 व्या वर्षासाठी 12000 रुपयांपर्यंतची वाढीव वॉरंटी उपलब्ध आहे. याशिवाय 30,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूटदेखील आहे. या ऑफर एसीई आवृत्तीवर लागू नाहीत. यासाठी स्वतंत्र ऑफर देण्यात आल्या आहेत.

होंडा जाझ
या कारवर 25,000 रुपयांची रोख सूट आहे. जुन्या कारची देवाणघेवाण केली तर अटींसह 25,000 रुपयांची अतिरिक्त सूटदेखील मिळू शकते.

होंडा डब्ल्यूआर-व्ही
होंडाच्या या कारवर 25,000 रुपयांची रोख सूट आहे. एक्सचेंज ऑफरखाली 20,000 रुपयांची अतिरिक्त सूट आहे.

होंडा सिटी
या कारवर 30 हजार रुपयांची रोख सूट मिळेल. एक्सचेंज ऑफरला 32,000 रुपयांची अतिरिक्त सवलत मिळेल.

होंडा बीआर-व्ही
या कारवर 1.10 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळू शकेल. नवीन बीआर-व्ही खरेदी करून जुन्या कार एक्सचेंजवर 33500 रुपयांपर्यंतची रोख सवलत, 50000 रुपयांची अतिरिक्त सूट आणि 26500 रुपयांच्या अॅक्सेसरीज देण्यात येत आहेत.

होंडा सिव्हिक
या कारवर अटींसह 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे.

होंडा सीआर-व्ही
या कारमध्ये अटींसह 4 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. होंडाच्या या सर्व ऑफर स्थान आणि रूपांनुसार बदलू शकतात. अधिक माहितीसाठी https://www.hondacarindia.com/offers या लिंकवर भेट देऊ शकता.AM News Developed by Kalavati Technologies